अंगणवाडी सेविकांकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:34+5:302021-09-24T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील भावी पिढीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जंत विरोधी मोहीम उघडून आठवडाभराचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर तालुक्यात ...

अंगणवाडी सेविकांकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप !
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर
महाराष्ट्रातील भावी पिढीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जंत विरोधी मोहीम उघडून आठवडाभराचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर तालुक्यात घोषित केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे वयाच्या २ ते १९ वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याची मोहीम मंगळवार (दि. २१) पासून सुरु केली आहे. ही मोहीम सप्ताहभरात राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरु असून पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद असल्याने त्यांच्या घरी जाऊन आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, स्वयंसेविका आदी जंतनाशक गोळ्यांचे घरोघर जाऊन वाटप करीत आहे. तसेच दोन वर्षांपासून ते १९ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.