येवला तालुक्यात २५ कोटी ६२ लाखांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:42 PM2020-07-09T17:42:28+5:302020-07-09T17:43:00+5:30

येवला : सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतले असून तालुक्यातील १ हजार ७७४ शेतर्क­यांना २५ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे.

Distribution of crop loan of 25 crore 62 lakhs in Yeola taluka | येवला तालुक्यात २५ कोटी ६२ लाखांचे पीक कर्ज वाटप

येवला तालुक्यात २५ कोटी ६२ लाखांचे पीक कर्ज वाटप

Next

येवला : सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतले असून तालुक्यातील १ हजार ७७४ शेतर्क­यांना २५ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे.
तालुक्यात खरीप पीककर्ज वाटपासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार सुलभ कर्ज वाटप अभियान राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिर्का­यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी कर्जवाटपाचा इष्टांक पूर्ण करत कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना प्रांताधिकारी कासार यांनी केली होती. तालुक्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा शाखांमधून ८२६ शेतर्क­यांना आठ कोटी ६९ लाखांचे, बँक आॅफ महाराष्ट्राच्या ४ शाखांमधून ३९१ शेतर्क­यांना सात कोटी आठ लाखांचे तर स्टेट बँकेच्या वतीने ५१ शेतर्क­यांना ८० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँक आॅफ बडोदाने आपल्या चार शाखांतून ३४२ शेतर्क­यांना ६ कोटी ७३ लाखांचे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९ शेतर्क­यांना ११ लाख, बँक आॅफ इंडियाने ४१ शेतर्क­यांना ४५ लाख, एचडीएफसी बँकेने २९ शेतर्क­यांना ३५ लाख, आयसीसीआय बँकेने ५ शेतर्क­यांना १२ लाख तर देना बँकेने ८० शेतर्क­यांना १ कोटी २६ लाखांचे कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे.

Web Title: Distribution of crop loan of 25 crore 62 lakhs in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी