बारागावपिंप्रीत कापडी पिशव्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:14+5:302021-09-04T04:18:14+5:30
--------------- पोळ्याचे साहित्य खरेदीला निरुत्साह सिन्नर : बैलपोळा तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बैलपोळा साहित्याच्या खरेदीसाठी फारसा उत्साह नसल्याचे ...

बारागावपिंप्रीत कापडी पिशव्यांचे वाटप
---------------
पोळ्याचे साहित्य खरेदीला निरुत्साह
सिन्नर : बैलपोळा तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बैलपोळा साहित्याच्या खरेदीसाठी फारसा उत्साह नसल्याचे सिन्नरच्या बाजारपेठेत दिसून आले. दोन वर्षांपासून कोरोनाचे आलेले संकट, शेतमालाला नसलेला भाव व यावर्षी अत्यल्प झालेला पाऊस यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आला आहे. यांत्रिकीकरणामुळे बैलांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे बैलपोळासाठी आवश्यक असणारे साहित्य विक्रीची दुकाने लावलेल्या दुकानदारांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
------------------
गायत्री मांडे यांचे संगीत विशारदमध्ये यश
सिन्नर : येथील ओंकार संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री मांडे हिने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या संगीतविशारद परीक्षेत नाशिकरोड केंद्रातून प्रथम क्रमांक मिळविला. संगीतविशारद पूर्ण या परीक्षेत ८००पैकी ५७६ गुण मिळवून तिने नाशिकरोड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. तिला पं. शंकराव वैरागकर, भारत मांडे, कविता मांडे यांचे मार्गदर्शन लाभले.