आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:49 IST2020-08-13T22:19:48+5:302020-08-13T23:49:02+5:30
चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
चांदवड तालुक्यातील अदिवासी बांधवाना जातीचे दाखले वितरण करताना प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे.
चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
अशिक्षीतपणातून आलेल्या अज्ञानामुळे कुठलेही कागदपत्रे न संभाळणाऱ्या अनेक आदिवासी बांधवाकडे पुराव्याअभावी जातीचे दाखलेच नाहीत. यामुळे जातीचा दाखलाच नाही तर मुलांना शाळेत का पाठवायचं, असा प्रश्न करत पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना मिळाली होती, यावर चौकशी केली असता हे आदिवासी बांधव शासनाच्या योजनांपासूनदेखील वंचित राहत असल्याचे समोर आले.