‘बिल्डर्स डे’निमित्त पुरस्काराचे वितरण

By Admin | Updated: December 11, 2015 00:05 IST2015-12-10T23:58:47+5:302015-12-11T00:05:12+5:30

‘बिल्डर्स डे’निमित्त पुरस्काराचे वितरण

Distribution of 'Builders' Day Award | ‘बिल्डर्स डे’निमित्त पुरस्काराचे वितरण

‘बिल्डर्स डे’निमित्त पुरस्काराचे वितरण

नाशिक : बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया नाशिक शाखेतर्फे आयोजित केलेल्या ‘बिल्डर्स डे’निमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवारी (दि.१२) गेट वे हॉटेल येथे सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट निवासी इमारत, सर्वोत्कृष्ट व्यावसायिक इमारत, सर्वोत्कृष्ट संस्थांची इमारत, सर्वोत्कृष्ट शासकीय, निमशासकीय इमारत’ या गटांमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. याकरिता नाशिकमधील ४५ बांधकाम व्यावसायिकांकडून अर्ज प्राप्त झाले होते. यामधूनच उत्कृष्ट इमारतींना पुरस्कार दिले जातील. पुरस्कार निवडीसाठी वास्तुविशारद शैलेश देवी, अभियंता संजय रत्नपारखी, वरिष्ठ सदस्य मोहन कटारिया, राजेंद्र मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल स्थापन करण्यात आले होते. स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद ख्रिस्तोपर बेनिंझर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष (पश्चिम विभाग) अनिल झिंझुवाडीया व राज्यअध्यक्ष सुनील मुंदडा उपस्थित असतील. दरम्यान, याच दिवशी दुपारी १२ वाजता बिल्डर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र आणि पश्चिम विभागातील जनरल व मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर यांची बैठक होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे अध्यक्ष रामेश्वर मालाणी व माजी अध्यक्ष विलास बिरारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Distribution of 'Builders' Day Award