खामखेड्यात बेबी केअर कीटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:07 IST2020-03-11T15:06:16+5:302020-03-11T15:07:05+5:30
खामखेडा ( वार्ताहर ) नवजात बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी बालकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक साहित्य असलेल्या बेबी केअर किटचे खामखेडा येथील लायकेश्वर अंगणवाडीत उपसरपंच संजय मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

-खामखेडा लायकेश्वर अंगवाडीत बेबी केअर किटचे वाटप करतांना उपसरपंच संजय मोरे, सुनील शेवाळे, अंगणवाडी सेविका सरला बच्छाव आदी.
या बेबी केअर किट मध्ये नवजात शिशुचे कपडे,लंगोट,लहान मुलांची झोपण्याची गादी, टॉवेल,तापमान यंत्र,शिशुसाठी शरीराला लावण्यासाठी २५० मिली तेल,मच्छरदाणी,लहान चटई,खेळणी,लहान मुलांचा शाम्पू,नखे काढण्यासाठी नेल कटर,लहान मुलाच्या आईसाठी हात धुण्याचे लिकविड आणि साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग या सर्व उपयुक्त वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे.आरोग्यासाठी हितकारक अशी ही योजना असल्याने लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उपसरपंच संजय मोरे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुनील शेवाळे,माजी सरपंच गोकुळ मोरे, प्रवीण शेवाळे, मधुकर हिरे , रवींद्र शेवाळे, जिभाऊ नदाळे, अंगणवाडी सेविका सरला बच्छाव आदि उपस्थित होते.