मेहुणेत दूषित पाणीपुरवठा

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T22:53:28+5:302014-07-25T00:28:00+5:30

मेहुणेत दूषित पाणीपुरवठा

Distributed water supply in Mehunate | मेहुणेत दूषित पाणीपुरवठा

मेहुणेत दूषित पाणीपुरवठा

मालेगाव : तालुक्यातील मेहुणे येथे पाणीपुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी पाण्याच्या टाकीची साफसफाई करीत नसल्याने गावकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा होत असून, संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली. याबाबत निमगाव प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आवारे, ग्रामसेवक, सरपंच यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मेहुणे येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत गाळ साचला असून, ती वेळेत साफ केली जात नाही. त्यामुळे गावाला दूषित पाणीपुरवठा होतो.
गावातील गटारी तुंबल्या असून , डासांचे साम्राज्य वाढले आहे. संबंधितांनी पाण्याच्या टाकीची साफसफाई करावी व पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी बदलावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर रवींद्र देवरे, संजय मोरे, नरहरी देवरे, नानासाहेब देवरे, आनंदा देवरे, गजानन अहिरे, रघुनाथ देवरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Distributed water supply in Mehunate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.