शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना निधी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:49 IST

नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, अशाप्रकारे १३० कोटी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात होणार आहेत.

ठळक मुद्देपंधरावा वित्त आयोग : १३० कोटींची होणार कामे

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिकजिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, अशाप्रकारे १३० कोटी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात होणार आहेत.कोरोनाच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून राज्य शासनस्तरावरून इतर योजनांमधून निधी उपलब्ध होण्यास अडचणी असताना केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकामी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. विकासकामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजूर असलेली विकासकामे सुरू करण्यास विलंब होत होता. सन २०२०-२१ या वर्षापासून आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामे व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागाने दिलेल्या आहेत.यापुढेही १५व्या वित्त आयोगाच्या वेळोवळी प्राप्त होणाºया निधीचे वितरण तात्काळ करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगांतर्गत पहिल्या व दुसºया हप्ताच्या प्राप्त निधीचे ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँकखाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करून प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिश्शाचा प्रथम व द्वितीय हप्ता प्राप्त झाला आहे.पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अबंधित निधीचा पहिला हप्ता वितरित केला असून, दुसरा बंधित निधी हप्ता वितरित करण्यात आला आहे. रक्कम ग्रामपंचायत स्तरावर खचार्बाबत नियोजन करावे व कामे विहित वेळेत होतील याबाबत गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे.- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायतींनी कामे सुचवावे व ग्रामविकासाची अत्यावश्यक कामे मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घेण्यात येऊन विहित वेळेत निधी खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे हाती घेण्यात यावे.- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जि. प.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक