Distance of Pimpalgaon-Chhargaon Road; Disadvantages of citizens | पिंपळगाव-आहेरगाव रस्त्याची दूरवस्था; नागरिकांची गैरसोय

पिंपळगाव-आहेरगाव रस्त्याची दूरवस्था; नागरिकांची गैरसोय

पिंपळगाव बसवंत ही बाजार पेठ असल्यामुळे आहेरगाव येथील नागरिकांना शेत माल विक्रीसाठी पिंपळगाव बसवंत येथेच आणावा लागतो. त्यामुळे आहेरगाव या रस्त्याचा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पादचारी तसेच वाहनचालकांची गैरसोय होते. जागोजागी खड्डे निर्माण झाल्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ता तेच नागरिकांना कळत नाही अशी अवस्था सदर रस्त्याची झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावर लहान- मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. परिसरातील द्राक्षे,टोमॅटो,कांदा व भाजीपाला याच रस्त्याने पिंपळगाव बाजार समितीत तसेच नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन जावा लागतो. मात्र उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनाचे नुकसान होते व वेळेत बाजार समितीत पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे सदर रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी  नागरिकांनी केली आहे.

Web Title:  Distance of Pimpalgaon-Chhargaon Road; Disadvantages of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.