सर्वसामान्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:46+5:302021-06-29T04:11:46+5:30

दुकानदारांचे दुर्लक्ष नाशिक : प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ...

Dissatisfied in general | सर्वसामान्यांमध्ये नाराजी

सर्वसामान्यांमध्ये नाराजी

दुकानदारांचे दुर्लक्ष

नाशिक : प्रशासनाने निर्बंध शिथिल करताच शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. अनेक दुकानदारही याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

पेरण्यांची लगबग

नाशिक : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाल्याने पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. ज्यांनी यापूर्वीच पेरण्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी पिके कोमेजू लागली होती.

अवैैध वाळू उपसा

नाशिक : ग्रामीण भागातील अनेक गावांतील नद्यामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असून याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध वाळू उपशाला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

मद्य दुकानांमध्ये गर्दी

नाशिक : निर्बंधांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने सोमवारी शहरातील मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये अनेक मद्यपींची गर्दी झाली असल्याचे दिसून आले. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. यामुळे अनेक वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

उघड्यावर अन्नपदार्थ विक्री

नाशिक : शहरातील अनेक भागात अन्न पदार्थांची उघड्यावर विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने रस्त्यावरील धूळ अन्नपदार्थांवर उडत असते. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Dissatisfied in general