मनपा कर्मचाऱ्यांत असंतोष

By Admin | Updated: April 3, 2017 01:34 IST2017-04-03T01:33:45+5:302017-04-03T01:34:01+5:30

नाशिक : महापालिकेत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याने कर्मचारीवर्गात असंतोष पसरला आहे.

Dissatisfaction with Municipal employees | मनपा कर्मचाऱ्यांत असंतोष

मनपा कर्मचाऱ्यांत असंतोष

 नाशिक : महापालिकेत सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत प्रशासनाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याने कर्मचारीवर्गात असंतोष पसरला आहे. प्रशासनाने तातडीने पदोन्नती समितीची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून पदोन्नत्या रखडल्या आहेत. पदोन्नती समितीच्या बैठकीला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सदर प्रश्न तातडीने मार्गी लावावा, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय भत्त्यात वाढ करून माहे एप्रिलपासून तो लागू करावा, गणवेशधारक पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना चार ते पाच वर्षांपासून गणवेश, बूट, रेनकोट, स्वेटर, गमबूट आदि साहित्य मिळालेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Dissatisfaction with Municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.