शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी भूमिअभिलेखविरुद्ध असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:25 IST

नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वाढत्या तक्रारींनी आमदार सुहास कांदे यांनी जनतेची कामे करा अन्यथा स्वत: आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने धाबे दणाणलेल्या प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक व पोलीस यांचा मोठा फौजफाटा अभिलेख कार्यालयाबाहेर आणल्याने तणाव निर्माण  झाला होता. दरम्यान, महिनाभरात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देआमदारांचा एल्गार : दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा फौजफाटा

नांदगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वाढत्या तक्रारींनी आमदार सुहास कांदे यांनी जनतेची कामे करा अन्यथा स्वत: आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने धाबे दणाणलेल्या प्रशासनाने दंगा नियंत्रण पथक व पोलीस यांचा मोठा फौजफाटा अभिलेख कार्यालयाबाहेर आणल्याने तणाव निर्माण  झाला होता. दरम्यान, महिनाभरात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.काल दीड दोन तास पीडितांनी आपल्या तक्रारी मांडतांना प्रत्येक कामाचे पैसे मागितले जातात. कार्यालयातील कर्मचारी लोकांना अपमानास्पद वागणूक देतात, कर्मचारी रजा न टाकता घरीच राहतात. अनेक वर्षांपासून नोंदीची प्रकरणे प्रलंबित आहेत. वारंवार चकरा मारूनही कामे होत नाहीत. अशा कितीतरी तक्रारींचा पाऊस नागरिकांनी पाडला. त्यामुळे विभागाचे जिल्हा अधीक्षक महेश शिंदे निरुत्तर झाले. भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी व त्यामागची कारणे अपूर्ण कर्मचारीवर्ग, कोरोनाची परिस्थिती अशी नसून निव्वळ आर्थिक बाबींशी व कामचुकार प्रवृत्तीशी निगडित असल्याचा आक्षेप नागरिकांनी खुलेआम घेतला. तेव्हा महेश शिंदे व तालुकास्तरीय अधिकारी विलास दाणी यांची खुलासे देताना दमछाक झाली. माजी सैनिकांच्या मुलाने सांगितले की, कार्यालयातील कर्मचाऱ्याने आम्हाला संसार नाही का! असे सांगून कामासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचे रडत रडत सांगितल्याने वातावरण गंभीर झाले. मोजणी शुल्क भरल्यानंतर  तारीख देऊनसुध्दा अधिकारी जात नाहीत, अशीही तक्रार आहे.   एक महिन्याचा अवधीजनतेच्या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी शिंदे यांनी एक महिन्याचा अवधी मागून सर्व प्रलंबित प्रकरणे व विनाकारण अडवणूक होत असलेली कामे यांचा निपटारा करण्याचे आश्वासन आमदार कांदे यांना दिले. तसेच दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिल्याने आमदार सुहास कांदे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकMLAआमदारagitationआंदोलन