विस्कळीत वीजपुरवठा

By Admin | Updated: January 6, 2017 00:00 IST2017-01-06T00:00:13+5:302017-01-06T00:00:25+5:30

शहा : शेतकऱ्यांची कामे खोळंबली

Disrupted power supply | विस्कळीत वीजपुरवठा

विस्कळीत वीजपुरवठा


सिन्नर : शहा येथे सातत्याने होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शुक्रवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकविकास मंचच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही सुधारणा झाल्या नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शुक्रवारी (दि. ६) वावी बसस्थानकाजवळील सिन्नर-शिर्डी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर संभाजी जाधव, बाबा गंधाके, राहुल महाले, अरुण जाधव, सोपान वायकर, राजू कोकाटे, राजेंद्र झिंजुर्डे, रावसाहेब वाणी, सागर गरकल, बी. डी. जाधव, सोपान जाधव, अमोल भवर, सखाराम गोरणे, रवींद्र म्हस्के, सर्जेराव सैंदर, फरीद सय्यद, गणेश बूब यांची नावे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Disrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.