पिकअप मध्येच बिघडली, व्यापाऱ्यांची माणुसकी धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST2021-06-06T04:11:11+5:302021-06-06T04:11:11+5:30
उमराणे बाजार समितीत कांद्यास चांगला मिळतो या अपेक्षेपोटी १०० ते १५० कि.मी. अंतरावरुन नेर कुसुंबे येथील शेतकरी भगवान पाटील ...

पिकअप मध्येच बिघडली, व्यापाऱ्यांची माणुसकी धावली
उमराणे बाजार समितीत कांद्यास चांगला मिळतो या अपेक्षेपोटी १०० ते १५० कि.मी. अंतरावरुन नेर कुसुंबे येथील शेतकरी भगवान पाटील यांची पिकअप शुक्रवारी ( दि. ४) कांदा विक्रीस आणली जात होती; मात्र बाजार आवारापासून एक ते दीड कि.मी.अंतरावर वाहनामध्ये बिघाड झाला. वाहन लवकर दुरुस्त होईना त्यावेळी शेतकऱ्याची घालमेल वाढली. आपण लिलावाच्या वेळेत पोहोचू शकणार नाही या भीतीने शेतकरी भगवान पाटील त्रस्त झाले. त्यांनी बाजार आवारात धाव घेत सहायक सचिव तुषार गायकवाड व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफणा तसेच कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांना सदर प्रकार सांगितला. सदर शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी लिलाव संपताच सर्व व्यापाऱ्यांनी बिघाड झालेल्या वाहनाजवळ जाऊन लिलाव केला. शिवाय चांगला बाजारभाव दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले.
येथील बाजार समितीत कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी काळजी घेतली जाते. अडचणीच्या वेळी येथील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी रस्त्यावर जाऊन लिलाव केल्याने शेतकऱ्यांप्रति असलेली आस्था लक्षात येते.
- सोनालीताई देवरे, मुख्य प्रशासक, बाजार समिती उमराणे
फोटो- ०५ उमराणे ओनियन
बिघाड झालेल्या कांदा वाहनाचा रस्त्यावर लिलाव करताना कांदा व्यापारी संदेश बाफणा, सुनील दत्तू देवरे व अन्य व्यापारी.
===Photopath===
050621\05nsk_13_05062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ उमराणे ओनियन