कोरोनामुक्तांच्या तुलनेत बाधित दीडपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST2021-02-13T04:16:39+5:302021-02-13T04:16:39+5:30
नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी (दि. १२) एकूण ...

कोरोनामुक्तांच्या तुलनेत बाधित दीडपट
नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी (दि. १२) एकूण १८० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, २९६ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. हे प्रमाण कोरोनामुक्तांच्या तुलनेत तब्बल दीडपट अधिक आहे. दरम्यान, नाशिक मनपाला आणि ग्रामीणला एक मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०६८ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १७ हजार ८४३वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १४ हजार ५०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,२७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.१६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.८४, नाशिक ग्रामीण ९६.३४, मालेगाव शहरात ९२.८९, तर जिल्हाबाह्य ९४.०१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख १५ हजार ९५३ असून, त्यातील तीन लाख ९६ हजार ८२७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १७ हजार ८४३ रुग्ण बाधित आढळून आले असून, १२७५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.