लसीकरण केंद्रावर वाद; पोलिसांचा हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST2021-05-12T04:15:16+5:302021-05-12T04:15:16+5:30
सातपूर विभागात तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लस मोहीम बंद होती. मंगळवारी लस उपलब्ध झाल्याने सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी ...

लसीकरण केंद्रावर वाद; पोलिसांचा हस्तक्षेप
सातपूर विभागात तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लस मोहीम बंद होती. मंगळवारी लस उपलब्ध झाल्याने सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी सातपूर कॉलनीतील मनपाच्या दवाखान्यात आणि ईएसआय रुग्णालयात रांग लावली होती. साधारणपणे एका केंद्रावर २०० च्या आसपास डोस उपलब्ध करून दिले जातात, तर पाचशेच्यावर लोकांनी गर्दी केली होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी केली. लस संपल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. त्यामुळे अशा नागरिकांनी संताप व्यक्त करून गोंधळ घातल्याने सातपूर कॉलनीतील मनपाच्या लसीकरण केंद्रावर वाद निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. त्यामुळे लसीकरणाची मोहीम सुरळीत झाली. ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस व १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीचा पहिला डोस वेळेवर मिळावा, म्हणून लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ऊर्जा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.