शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सेना नगरसेवकाला निधी दिल्याने भाजपांतर्गत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:33 IST

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या नगरसेवकाला दिल्याने भाजपांतर्गत धुसफूस वाढली आहे.

सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या नगरसेवकाला दिल्याने भाजपांतर्गत धुसफूस वाढली आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदाराकडून निधी मिळूनही सेनेच्या नगरसेवकाने फलक लावून सारे श्रेय सेनेला घेतल्याने भाजपा नगरसेवक अलका आहिरे यांनी आपल्याच पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे ठरविले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या आमदारांकडूनच शिवसेनेच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देत शिवसेना वाढविण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोपही आहिरे यांनी केल्याने भाजपात खळबळ उडाली आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ मधील आठवलेनगर परिसरात शनिवारी भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून सुमारे ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आठवलेनगर, रामकृष्णनगर भाग हा विकासकामांपासून दुर्लक्षित असल्याने याठिकाणी विकासकामे करावे यासाठी प्रभागाचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी मनपाकडे पाठपुरावा केला होता, यानंतर या कामाची निविदाप्रक्रियादेखील झाली असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामास स्थगिती दिली होती. यानंतर दातीर व आरोटे यांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे पाठपुरावर करून ५० लाख रुपयांचा निधी त्यांच्या आमदार निधीतून मंजूर करून घेतला.प्रभागात विकासकामे करण्यासाठी भाजपा आमदार सीमा हिरे या भाजपाच्याच नगरसेवकांना निधी न देता शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी देत असल्याचा आरोप करून आहिरे यांनी याबाबत पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करणार असल्याचे सांगितले.नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपाकडून आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक अलका आहिरे यांनीदेखील विधानसभा निवडणुकीची तयारी चालविल्याने सीमा हिरे यांनी सेनेला विकासकामांसाठी निधी देऊन अहिरे यांच्या प्रती असलेली आपली भावना प्रत्यक्ष व्यक्त केली, तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून निवडणुकीत सेना नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी हिरे यांनी निधी दिल्याचे बोलले जात आहे. सेनेनेदेखील आगामी निवडणूक लक्षात घेता, फलकबाजीतून भाजपाला श्रेय न देता स्वत:कडे घेतले आहे.भाजपाच्या आमदार स्थानिक विकास निधीतून प्रभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम सेनेच्या नगरसेवकांकडून केला जात असताना याच प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक अलका आहिरे यांना मात्र सेनेच्या नगरसेवकांनी बोलविले नाही. शिवाय या कामांचे ठिकठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनरवर भाजपाच्या एकाही नेत्यांचा फोटो न लावता, सारे श्रेय सेनेकडे घेतले. या बाबीला भाजपा नगरसेवक अलका आहिरे यांनी हरकत घेतली असून, सेनेला दोष देतानाच आहिरे यांनी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यावरदेखील टीका केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMLAआमदारSeema Hariसीमा हिरेNashikनाशिक