शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये ठेकेदारीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:16 IST

नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल्याचे समजते.

ठळक मुद्देघरपट्टी खासगीकरणाच्या प्रस्तावावरून देखील वाद झाल्याचे समजते.

नाशिक : नगरसेवकांनी सुचवलेले कामगार न घेणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीला बिल अदा करण्याच्या विषयावर भाजपच्या पार्टी मीटिंगमध्ये शाब्दिक बोलाचाली झाल्याचे वृत्त आहे. महापौर, काही नगरसेवक आणि शहराध्यक्षांमध्ये काहीशी खडाजंगी झाल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आल्याचे समजते.

महापालिकेची मासिक महासभा गुरुवारी (दि. १८) होणार असून, त्यापूर्वी प्रथेप्रमाणे पक्षाच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आऊटसोर्सिंगप्रकरणी वॉटर ग्रेस या कंपनीचे बिल रोखून धरण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. त्यानंतरही हे बिल अदा झाल्याचे काही नगरसेवकांचे म्हणणे होते.

वॉटर ग्रेस कंपनी नगरसेवकांचे कामगार घेत नसल्याने अशाप्रकारे बिल कसे काय अदा झाले, यावरून हा वाद झाल्याचे समजते. संबंधित ठेकेदार हा महापौर, शहराध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना विचारा असे उत्तर देतो, त्यामुळे त्याचा काय अर्थ घ्यायचा, असा काही नगरसेवकांचा सवाल होता, असे कळते. त्यावरून वाद वाढत गेल्यानंतर शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी महापौरांना देखील शांत राहण्यास सांगितले. त्यामुळे महापौर संतापले आणि तुम्हाला काय सांगायला जाते, मला महासभेला सामोरे जावे लागते, असे सांगितल्याने त्यांच्यातही दोन दोन शब्द झाल्याचे समजते.यावेळी घरपट्टी खासगीकरणाच्या प्रस्तावावरून देखील वाद झाल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा