सेंट्रल किचन शेडचा वाद मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:13 PM2020-01-29T22:13:43+5:302020-01-30T00:18:07+5:30

सेंट्रल किचन शेडचा वाद आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मिटणार असल्याची माहिती मुख्याध्यापक जिल्हा संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.

The dispute over the central kitchen shed will be resolved | सेंट्रल किचन शेडचा वाद मिटणार

मालेगाव शहर व परिसरातील सेंट्रल किचन शेडच्या वादावर अव्वर सचिव प्रमोद पाटील व उपसचिव राजेंद्र पवार यांच्यासोबत चर्चा करताना आमदार डॉ. सुधीर तांबे. समवेत जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख.

Next
ठळक मुद्देसिन्नर : मुख्याध्यापक संघाला आश्वासन

सिन्नर : सेंट्रल किचन शेडचा वाद आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मिटणार असल्याची माहिती मुख्याध्यापक जिल्हा संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.
सेंट्रल किचन योजना शासनाने लागू केली होती. यास मालेगाव शहर व परिसरातील शाळांनी तीव्र विरोध केला होता. याबाबत आंदोलन, उपोषणही झाले. महापालिका आयुक्त व प्रशासन अधिकारी या प्रकरणाची कोणतीही दखल घेण्यास तयार नव्हते. अखेरीस हा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला होता. पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अव्वर सचिव प्रमोद पाटील व उपसचिव राजेंद्र पवार यांच्या सोबत याविषयावर चर्चा झाली. ज्या शाळांकडे किचन शेड आहे अशा शाळांना सेंट्रल किचन योजनेपासून वगळण्यात येणार असल्याची शिफारस अव्वर सचिव प्रमोद पाटील व उपसचिव राजेंद्र पवार यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
सेंट्रल किचन शेडमार्फत कोणत्याही शाळेला शालेय पोषण आहार पाठविला जाणार नाही, अशा आशयाचे पत्र येत्या आठ दिवसांत मालेगाव महापालिका आयुक्त व प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याचे अव्वर सचिव पाटील यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी, ४५ ते ५० हजार विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहिले असून, या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मुख्याध्यापक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मालेगावचे टीडीएफ नेते विकास मंडळ, सुधाकर महाजन, सुधीर ठाकूर, तुकाराम मांडवडे, संजय वाघ यांच्यासह मालेगाव परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, शाळांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे सेंट्रल किचन शेडमार्फत शाळांना पोषण आहार पाठवायला नको होता. गेल्या तीन महिन्यांपासून ४५ ते ५० हजार विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित आहेत. याला महापालिका आयुक्त व प्रशासन अधिकारी जबाबदार आहे.

Web Title: The dispute over the central kitchen shed will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.