सातपूरला डॉक्टर, नगरसेवकात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:20+5:302021-04-30T04:19:20+5:30

सातपूर काॅलनीतील एमएचबी कॉलनीतील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुवर्णा वाजे या काेराेनाबाधित झाल्याने ...

Dispute between doctor and corporator in Satpur | सातपूरला डॉक्टर, नगरसेवकात वाद

सातपूरला डॉक्टर, नगरसेवकात वाद

सातपूर काॅलनीतील एमएचबी कॉलनीतील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुवर्णा वाजे या काेराेनाबाधित झाल्याने त्यांचा पदभार डॉ. शीतल पगार यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. शीतल पगार गुरुवारी पहिल्याच दिवशी आल्या होत्या. गुरुवारी या दवाखान्यात केवळ ४० नागरिकांना पुरेल इतकीच लसीचा पुरवठा देण्यात आला हाेता. त्यामुळे रांगेतील अनेक रुग्णांना माघारी फिरावे लागले. काही ज्येष्ठ नागरिकांच्या पहिल्या डाेसची मुदत संपल्याने ते ४५ दिवसानंतर दुसरा डाेस घेण्यासाठी आले हाेते. त्यांना डाेस न मिळाल्यामुळे त्यांनी प्रभागाचे नगरसेवक सलीम शेख यांच्याकडे तक्रार केली. नेमकी अडचण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नगरसेवक शेख गेले असता ‘शासनाकडे पैसे नसल्यामुळे लस मिळत नाही.’ असे उत्तर दिले. तर शासनाला आणि महानगरपालिकेला बदनाम करू नका. लस शिल्लक नाही असे सांगा, असा सल्ला शेख यांनी दिल्यानंतर डॉक्टर आणि शेख यांच्यात वाद निर्माण झाला. डॉक्टरांनी थेट पोलीस ठाण्यात आणि आयएमएकडे तक्रार केली. सातपूर पाेलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, आयएमएचे अध्यक्ष हेमंत साेननीस, डाॅ. रणदिवे, डाॅ. अमाेल वाजे, डॉ. विठ्ठल गाजरे, आदींनी धाव घेऊन वादाची माहिती घेतली. नगरसेवक शेख आणि डॉ. शीतल पगार यांच्यात झालेले गैरसमज दूर करून वादावर पडदा टाकला.

(फोटो २९ सातपूर) मनपा रुग्णालयातील डॉक्टर आणि नगरसेवक सलीम शेख यांच्या वादावर चर्चा करताना आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत साेननीस समवेत डाॅ. रणदिवे, डाॅ. अमाेल वाजे, डॉ. विठ्ठल गाजरे, हेमंत नागरे आदी.

Web Title: Dispute between doctor and corporator in Satpur