शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वाकी-खापरी धरणातून दुसऱ्या दिवशीही विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:12 IST

इगतपुरी तालुक्यात घोटीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या वाकी-खापरी धरणातून सलग दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात सद्यस्थितीत ८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.

नाशिक : इगतपुरी तालुक्यात घोटीपासून काही अंतरावर असलेल्या असलेल्या वाकी-खापरी धरणातून सलग दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात सद्यस्थितीत ८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी सुमारे १९० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बुधवारी १२५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.मराठवाड्याच्या सिंचनाची आवश्यकता लक्षात घेऊन घोटीपासून जवळच कुर्नोली गावाजवळ दोन हजार ६८० दलघफू क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे. सन २०१७ मध्ये या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले असल्यामुळे गेल्यावर्षी केवळ चाचणी म्हणून धरणात सुमारे ८८ टक्केपाणीसाठा प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात आला होता. मागीलवर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे आणि धरणक्षेत्रात पुरेसा पाऊसही नसल्यामुळे साठवलेले पाणी कायम ठेवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. यंदा पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यात आला आहे. धरण जवळपास ८६ टक्के भरले असले तरी दुसरीकडे पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होताना दिसते. वाकी-खापरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्यामुळे विसर्ग अधिक वाढविला जाण्याची शक्यता आहे. मागीलवर्षी पेक्षा यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे आॅगस्टच्या सुरुवातीलाच विक्रमी पावसाची नोंद झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. या धरणाच्या पाण्यावर १.१५ मेगावॉटचा वीजप्रकल्प तयार होणार असून, खासगीकरणातून हा प्रकल्प चालणार आहे. यासाठीची सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, औरंगाबाद येथील एका कंपनीकडून वीजनिर्मिती हाती घेतली जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी