शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे नाशिक अतिक्रमित ठरविल्याने अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:43 IST

महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नाशिक : महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. अर्थात, यासंदर्भात महापालिकेतील सर्व विभाग अत्यंत अनभिज्ञ आहेत. तथापि, न्यायालयाने आता कारवाईचे आदेश दिले तर शहर उद्ध्वस्त होईल, अशी भीती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी व्यक्त केली आहे.  महापालिकेच्या वतीने ठराविक कालावधीनंतर शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केले जाते. सुरुवातीला हे काम महापालिकेचे कर्मचारी करीत मात्र नंतर शहर वाढल्याने खासगी एजन्सीकडून केले जाते तसेच उपग्रहाद्वारेदेखील सर्वेक्षण केले जाते. महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम असताना सर्वेक्षणाचे हे काम सुरू झाले होते. दरम्यान, संथ असलेल्या या कामाला गती मिळाली असली तरी त्याचे निकष जे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर नाहीत ते धक्कादायक असून २ लाख ६९ हजार मिळकती आत्तापर्यंत बेकायदेशीर ठरविण्यात आल्या आहेत. नाशिक शहरातील एकूण मिळकतींची संख्या ४ लाख १७ हजार असून त्यातील साडेतीन लाख मिळकतींचे सर्र्वेक्षण झाले आहे. त्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारती किंवा बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात ही माहिती देण्यात आल्याचे सध्या सोशल मीडियावर फिरते आहे. तत्पूर्वी ही माहिती आयुक्त मुंढे यांनी स्थायी समितीच्या चर्चेच्या वेळीदेखील सादर केली होती.विधी विभागही अनभिज्ञतुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर बांधकामांबाबत उच्च न्यायालयात माहिती दिल्याने न्यायालयाने त्यांचे कौतुक केले अशाप्रकारचे वृत्त सध्या सोशल मीडियावर पसरविले जात असले तरी महापालिकेच्या विधी विभागाकडे यासंदर्भात चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. मग हा काय प्रकार आहे असा प्रश्न बोरस्ते यांनी केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमणtukaram mundheतुकाराम मुंढेNashikनाशिक