शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपंग सहायता दिनीच दिव्यांगाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:50 IST

शुक्रवारी सर्वत्र जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा होत असताना वाहने उचलणाऱ्या टोर्इंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र एका दिव्यांगाला हीन वागणूक देण्यात आली. वाहनावर ‘अपंगत्वाचे वाहन’ असे बोधचिन्ह असतानाही कर्मचाºयांनी कोणतीही उद्घोषणा आणि नोंद न करता वाहन उचलून नेलेच शिवाय वाहन सोडविण्यासाठी तब्बल दीड तास ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देटोइंग ठेकेदार कर्मचाऱ्यांचा प्रताप नियमबाह्य गाडी उचलली; दंडाची पावतीही फाडली

नाशिक : शुक्रवारी सर्वत्र जागतिक अपंग सहाय्यता दिन साजरा होत असताना वाहने उचलणाऱ्या टोर्इंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र एका दिव्यांगाला हीन वागणूक देण्यात आली. वाहनावर ‘अपंगत्वाचे वाहन’ असे बोधचिन्ह असतानाही कर्मचाºयांनी कोणतीही उद्घोषणा आणि नोंद न करता वाहन उचलून नेलेच शिवाय वाहन सोडविण्यासाठी तब्बल दीड तास ताटकळत ठेवल्याचा प्रकार घडला.शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शरद ठाकरे हे अपंग बांधव आपल्या चारचाकी वाहनातून पंडित कॉलनीत खरेदीसाठी आले असता त्यांनी विषम तारखेनुसार रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले होते. याचवेळी आलेल्या टोर्इंग वाहनातील कर्मचाºयांनी गाडी टोर्इंग करून घेऊन गेले. विशेष म्हणजे नियमानुसार गाडी उचलण्यापूर्वी तशी उद्घोषणा करावी लागते आणि गाडी उचलल्यानंतर रस्त्यावर तसे नमूद करावे लागते. मात्र यापैकी काहीही न करता अपंगत्वाची असलेली ‘इनव्हॅलिड कार’ कर्मचाºयांनी उचलून नेली.सदर प्रकार लक्षात आल्यानंतर ठाकरे यांनी जुने आयुक्तालयात गाडी घेण्यासाठी गेले असता त्यांनी आपण अपंग असल्याचे आणि गाडीदेखील अपंग कॅटेगरीतील असल्याचे कागदपत्रे संबंधितांना दाखविले. मात्र सुरुवातीला कुणीही त्यांचे कागदपत्रे पाहिले नाही तसेच आपण अपंग असल्याचे ते सांगत असतानाही त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. सुमारे तासभर ते पोलीस आणि ठेकेदाराकडील माणसांची विनवणी करीत होते. मात्र ठेकेदाराकडील मंडळी काहीही ऐकत नव्हते.पोलीस आयुक्तांना भेटण्याचा सल्लाशरद ठाकरे यांनी टोर्इंग कर्मचाºयांना सर्व प्रकार सांगूनही कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याउलट तुम्हाला गाडी हवी असेल तर तुम्ही पोलीस आयुक्तांना जाऊन भेटा त्यानंतरच गाडी सोडली जाईल, असा सल्ला येथील कर्मचाºयांनी ठाकरे यांना दिला. दिव्यांग असो वा दिव्यांग संघटनेचा पदाधिकारी आयुक्तांना भेटून या असे म्हणत ठाकरे यांची अडवणूक केली, असे ठाकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. सुमारे तासभर ठाकरे यांना वाहतूक पोलीस आणि ठेकेदार यांची विनवणी करावी लागली़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस