मेशी : नाशिक जिल्हा ग्रामीण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृह देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. सक्तीची वीजबिल वसुली व वीजतोडणी याबाबत दिली जाणारी धमकी, जिल्हा बँकेची सक्तीची कर्जवसुली, अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत तत्काळ मिळावी, पीक विमा रक्कम मिळावी, कोरोनाकाळातील घरगुती वीजबिल माफ करण्यात यावे तसेच संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे यासंबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष तुषार शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडून आले त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद पगार, सोमनाथ बोराडे, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, सीताराम पिंगळे, परशराम शिंदे, सुभाष अहिरे, श्रावण पाटील, रवींद्र शेवाळे, संजय जाधव, सुभाष पवार, रामकृष्ण जाधव, भाऊसाहेब तासकर, गजानन घोटेकर, रवींद्र तळेकर, राम राजोळे, प्रकाश जाधव, भाई पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:42 IST
मेशी : नाशिक जिल्हा ग्रामीण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृह देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत तत्काळ मिळावी,