पाटपिंप्रीतील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: February 6, 2016 22:45 IST2016-02-06T22:43:59+5:302016-02-06T22:45:39+5:30
पाटपिंप्रीतील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

पाटपिंप्रीतील ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
सिन्नर : तालुक्यातील पाटपिंप्री येथील ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
सरपंच भानुदास उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवक प्रतिभा बच्छाव यांनी अहवाल वाचन करून विविध शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी हगणदारी मुक्त गाव अभियान, शौचालय अनुदान, घरपट्टी वसुली, १४व्या वित्त आयोगातून सौर पथदीप उभारणे आदि विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. खासदार निधीतून करण्यात आलेल्या रस्ता कॉँक्रिटीकरणाचे काम
निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सात गाव पाणीपुरवठा योजना अद्याप कार्यान्वित झालेली
नाही. त्यामुळे गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टॅँकर सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामसभेस मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवल्याबद्दल
ग्रामस्थांचे आभार मानून सभा संपल्याचे उपसरपंच कावेरी
ताकाटे यांनी जाहीर केले.
(वार्ताहर)