मालेगावी भाजप बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:59+5:302021-06-21T04:11:59+5:30
सुरेश निकम यांनी ६ जुलैपर्यंत पर्यावरण पंधरवडा अभियान कार्यक्रम राबवण्याबाबत सूचना केली. नंदू सोयगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशकडून आलेल्या ...

मालेगावी भाजप बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा
सुरेश निकम यांनी ६ जुलैपर्यंत पर्यावरण पंधरवडा अभियान कार्यक्रम राबवण्याबाबत सूचना केली. नंदू सोयगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशकडून आलेल्या कार्यक्रमाबाबत उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता यांनी माहिती दिली. प्रदेश कार्यकारी सदस्य लकी गिल यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या व प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनीषा पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. देवा पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुनील शेलार यांनी आभार मानले. यावेळी मुकेश झुणझुणवाला, नगरसेवक विजय देवरे, भरत पोफळे, नंदूतात्या सोयगावकर, पोपट लोंढे, यू. आर. पाटील, बाळासाहेब सावकार, देवा पाटील, राजेश वाजपेयी, सतीश उपाध्ये, हरिशंकर दायमा, हेमंत पुरकर, तुषार मिश्रा, योगेश पाथरे, राहुल आघारकर, महेश निकम, प्रकाश मुळे, बापू वाघ आदी उपस्थित होते.