‘स्मार्ट सिटी’संबंधी उद्योजक, मनपा प्रशासन यांची चर्चा
By Admin | Updated: November 17, 2015 23:59 IST2015-11-17T23:59:15+5:302015-11-17T23:59:42+5:30
‘स्मार्ट सिटी’संबंधी उद्योजक, मनपा प्रशासन यांची चर्चा

‘स्मार्ट सिटी’संबंधी उद्योजक, मनपा प्रशासन यांची चर्चा
सातपूर : स्मार्ट नाशिक साकारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांवर जो काही कराचा बोजा पडणार आहे. त्याबद्दलात महानगरपालिका कोणत्या आणि काय सुविधा पुरविणार असा थेट सवाल उद्योजकांनी उपस्थित केला. त्याचबरोबर विविध उपाय योजना करण्याच्याही सूचना यावेळी करण्यात आल्या.
नाशिक महापालिका अधिकाऱ्यांनी निमा, आयमा, नाईस, महाराष्ट्र चेंबर्स यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत निमात ‘स्मार्ट सिटी’बाबत अपेक्षा या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महापालिकेचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, सहायक आयुक्त चेतना केसुरे, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, सरचिटणीस राजू अहिरे, नीलिमा पाटील, रमेश वैश्य, व्हिनस वाणी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. स्मार्ट सिटीसाठी नाशिकची निवड झाली असून, त्यासाठी सूचना आणि कराचा बोजा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा नियोजन, जुन्या नाशिकमध्ये भुयारी गटार योजना, हॉकर्स झोन, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण साफसफाई यासह विविध सूचना मांडण्यात आल्या. या चर्चेत मनीष कोठारी, ज्ञानेश्वर गोपाळे, एम. जी. कुलकर्णी, रमेश पवार, हर्षद ब्राह्मणकर, समीर पटवा, मनीष रावल, अपूर्वा जाखडी, सतीष कोठारी, मनोहर देशपांडे, मंगेश काठे, बाळासाहेब जाधव, प्रकाश ब्राह्मणकर, उन्मेश कुलकर्णी, धनंजय दीक्षित, दिलीपसिंह बेनीवाल, सुधाकर देशमुख, प्रदीप पेशकार आदिंनी भाग घेतला.