घोटीत समृद्धीबाधितांच्या अडचणींबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:10+5:302021-08-15T04:17:10+5:30
घोटी : प्रस्तावित बुलेट ट्रेनबाबत घोटीत शेतकरी वर्गाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत लोकप्रतिनिधी, शेतकरी व पदाधिकारी सहभागी झाले होते. ...

घोटीत समृद्धीबाधितांच्या अडचणींबाबत चर्चा
घोटी : प्रस्तावित बुलेट ट्रेनबाबत घोटीत शेतकरी वर्गाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत लोकप्रतिनिधी, शेतकरी व पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बाजूने असून, शेतकऱ्यांची जी भूमिका असेल त्यासाठी लढा देऊ असा निर्धार करण्यात आला. या बैठकीत समृद्धीबाधितांच्या अडचणी व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
इगतपुरी तालुक्यातून मुंबई-नागपुर बुलेट ट्रेन प्रस्तावित असून, भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय व त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तसेच त्यांना मान्य असेल तरच तालुक्यातुन जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी लागणारी जमीन शेतकरी देण्यात सहकार्य करतील अन्यथा एक इंचही जमीन शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय दिली जाणार नाही. यासाठी आपण शेतकरी बांधवांच्या सोबत राहू. शेतकरी बांधवांनी एकोप्याने निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
याप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, जनार्दन माळी, केंरू खतेले, गोपाळ लहंगे, पांडुरंग वारुंगसे, धांडे पाटील, अरुण पा, गायकर, दौलत दुभाषे, भास्कर गुंजाळ, रमेश जाधव, राजू भटाटे, ज्ञानेश्वर कडू, वसंत भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, शेतकरी बांधवांनी यावेळी आपल्या समस्या, मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील एकूण शेतजमिनीतून ७५ टक्के जमीन वेगवेगळ्या शासनाच्या प्रकल्पासाठी संपादित केली आहे. यात महामार्ग, रेल्वे, उद्योग, धरणे, तलाव, वन, संरक्षण विभाग, शासकीय इमारती, समृद्धी मार्ग अशांसाठी घेतली आहे. शेतकरी फसवणूक केली जात आहे, धरणे आणि समृद्धी मार्गात दडपशाही, फसवणूक करून जमिनी घेतल्या. अजूनही काही शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही. अनेक गैरप्रकार दिशाभूल करून व्यवहार करून जमिनी संपादित केली समृद्धी मार्ग करताना आजही अनेक लगतच्या, बाधित शेतकऱ्यांची अडवणूक केली जातेय, वहिवाट रस्ते, शिवार रस्ता, बंद केले, पाइपलाइन, जमीन सपाटीकरण न करणे, पाण्याचे मार्ग बदलून शेतीचे नुकसान करणे, सरकारी रस्ते पूर्ण खराब केले आहे. लगतच्या खासगी इमारती नुकसान करणे, स्थानिक लोकांना रोजगार, कामे न देणे अशा अनेक तक्रारी शेतकरी बांधवांनी यावेळी केल्या.
(१४ घोटी मिटिंग)
140821\14nsk_25_14082021_13.jpg
१४ घोटी मिटींग