विमानसेवेबाबत प्रधान सचिवांशी चर्चा

By Admin | Updated: October 16, 2016 02:03 IST2016-10-16T01:58:42+5:302016-10-16T02:03:02+5:30

विमानसेवेबाबत प्रधान सचिवांशी चर्चा

Discussion with the Principal Secretaries about the airline | विमानसेवेबाबत प्रधान सचिवांशी चर्चा

विमानसेवेबाबत प्रधान सचिवांशी चर्चा

सातपूर : नाशिकच्या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू व्हावी म्हणून निमा पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव शामलाल गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली. झालेल्या चर्चेनुसार एअर इंडियाचे प्रतिनिधी नाशिकला लवकरच भेट देणार असल्याची माहिती निमाने दिली. मुंबईला जाऊन निमा पदाधिकाऱ्यांनी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव शामलाल गोयल यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली. या बैठकीला विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मुंबई विमानतळ हाताळण्याची जबाबदारी असलेले जीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चेत निमाचे सरचिटणीस उदय खरोटे, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, पायाभूत सेवासुविधा समितीचे अध्यक्ष मनीष रावळ, मनीष कोठारी आदि सहभागी झाले होते.

Web Title: Discussion with the Principal Secretaries about the airline