शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रवेशाच्या अज्ञात फलकाने शहरात चर्चा

By श्याम बागुल | Updated: July 31, 2019 14:00 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरूपयोग

ठळक मुद्देफलक लावणाऱ्याचा शोध : सोशल माध्यमावर व्हायरल प्रवेशासाठी नियम व अटी नमूद करून भाजपाची खिल्ली उडविण्यात आली

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : राज्य पातळीवर सध्या सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षात विरोधकांच्या प्रवेशावरून सोशल माध्यमावर टिका-टिप्पणी केली जात असताना शहरात मध्यरात्रीच्या सुमारास ‘भाजपा प्रवेश देणे आहे’ अशा आशयाचे फलक सर्वत्र लावण्यात आले असून, या फलकावरील मजकूर भाजपाची राजकीय खिल्ली उडविणारा असल्याने अशा प्रकारचे फलक कोणी लावले याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होवू लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपा, सेनेत पक्षांतर करून प्रवेश करीत असून, त्यामुळे विरोधी पक्षाला दररोज धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. विरोधी पक्षांनी या पक्षांतराला सत्तेचा दुरूपयोग ठरविला असून, त्यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. सोशल माध्यमावरही दोन्ही बाजुंकडून टिका-टिप्पणी केलेले संदेश व्हायरल केले जात आहेत. अशातच मंगळवारी मध्यरात्री केव्हा तरी शहरातील डोंगरे मैदान, एबीबी सर्कल, उड्डाणपूल, मुंबई नाका आदी भागात ‘भाजपा प्रवेश देणे आहे’ अशा आशयाचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत. वरकरणी सदरचे फलक भाजपानेच लावले असावेत असा भास होवून त्याखाली प्रवेशाखाली त्वरीत संपर्क साधा असे नमूद करून टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. मात्र या मजकुरात भाजपात प्रवेशासाठी नियम व अटी नमूद करून भाजपाची खिल्ली उडविण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून सदरचा फलक लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ‘ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती व सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा’ असे नियम व अटी देण्यात आल्या असून, तळटिपेत ‘विचारधारेची कुठलीही अट नाही, आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अ‍ॅडजस्ट करता येतील’ असा मजकूर लिहून शिवसेनेलाही त्यात खेचले आहे. त्यामुळे सदरचे फलक विरोधकांनीच लावल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र फलक लावणा-या व्यक्ती वा पक्षाने स्वत:ची ओळख दडविली असून, फलकावर मात्र भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’ कायम ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाcongressकाँग्रेस