ऊर्जामंत्र्यांच्या आढावा बैठकीत सिन्नरच्या वीज समस्यांवर चर्चा
By Admin | Updated: July 16, 2017 01:06 IST2017-07-16T01:05:44+5:302017-07-16T01:06:14+5:30
सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न झाली.

ऊर्जामंत्र्यांच्या आढावा बैठकीत सिन्नरच्या वीज समस्यांवर चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न झाली. त्यात तालुक्यातील शहा येथील वीज उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीत सिन्नरच्या वीज समस्यांबाबत चर्चा करण्यात येऊन आढावा घेण्यात आला. सिन्नर तालुक्यातील पूर्व भागाच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी शहा येथे २२० के.व्ही. उपकेंद्र प्रस्तावित असून, ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेक यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर उपकेंद्राच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. शहा येथील नवीन २२० के. व्ही. ५० एमव्हीए ताकदीच्या उपकेंद्राचा प्रस्ताव महापारेषणने तांत्रिक योग्यता अहवालासह मुंबईच्या प्रधान कार्यालयात सादर केला आहे.