शिवसेना बैठकीत शिबिराच्या नियोजनावर चर्चा

By Admin | Updated: April 11, 2016 00:12 IST2016-04-10T23:12:38+5:302016-04-11T00:12:22+5:30

शिवसेना बैठकीत शिबिराच्या नियोजनावर चर्चा

Discuss on the planning of the Shiv Sena meeting | शिवसेना बैठकीत शिबिराच्या नियोजनावर चर्चा

शिवसेना बैठकीत शिबिराच्या नियोजनावर चर्चा

नाशिक : आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असून, त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे़ नुकत्याच झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही येत्या २४ एप्रिल रोजी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबिराचे आयोजन केले आहे़ या शिबिराच्या नियोजनाबाबत रविवारी (दि़१०) शिवसेना शहर कार्यालयात संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा व जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली़
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय चौधरी, आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली़ गंगापूर नाक्याजवळील चोपडा बॅन्क्वेट हॉलमध्ये रविवारी (दि़ २४) सकाळी नऊ वाजता सेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिबिरास सुरुवात होणार आहे़ तर या शिबिराच्या समारोपप्रसंगी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे़ या शिबिरामध्ये शेती व्यवसायासमोरील अडचणी व उपाय, शिवसेनेचा प्रवास, युवा संघटन, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आदि विषयांवर चर्चा केली जाणार असून, यामध्ये पानगुडे पाटील, गुलाबराव पाटील आदिंचा समावेश असणार आहे़
या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, डी़ जी़ सूर्यवंशी, अजय बोरस्ते आदिंसह शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Discuss on the planning of the Shiv Sena meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.