शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

जिल्हा परिषदेतही चर्चा नैतिक राजीनाम्याची

By admin | Updated: May 20, 2014 00:37 IST

पदाधिकार्‍यांच्या गटातच राष्ट्रवादीची पिछाडी

पदाधिकार्‍यांच्या गटातच राष्ट्रवादीची पिछाडीनाशिक : दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पराभवाचे कवित्व सुरू झाले असून, जिल्हा परिषदेच्या सहापैकी तब्बल चार पदाधिकार्‍यांच्या गटांतूनच राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडल्याने या पदाधिकार्‍यांनी आता नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी चर्चा दबक्या आवाजात जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरू झाली आहे.नाशिक लोेकसभा मतदारसंघातून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. त्यांना एकमेव इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून नाममात्र आघाडी मिळाली; मात्र ती इगतपुरी तालुक्यातून नव्हे, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातून मिळाल्याचे आता उघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एकूण झालेल्या ७४ हजार २३१ मतदानापैकी भुजबळ यांना ३३ हजार ९८२, तर हेमंत गोडसे यांना १८ हजार ५९० मते मिळाली. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या अंजनेरी गटासह हरसूल व ठाणापाडा गटातूनच ही आघाडी मिळाली. त्याउलट इगतपुरी तालुक्यातील पाचपैकी अवघ्या शिरसाटे व खेड गटानेच भुजबळ यांना आघाडी दिली. त्याउलट बांधकाम सभापती अलका उदय जाधव यांच्या घोटी गटातून सुमारे ४ ते ५ हजारांनी भुजबळ मागे पडले. एकट्या घोटी शहरातून ते साडेतीन हजाराने मागे आहेत. समाजकल्याण सभापती राजेश नवाळे यांच्या मुसळगाव गटातूनही छगन भुजबळ पिछाडीवरच आहेत. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातूनही शिक्षण सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या चांदवड तालुक्यातून राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार या ७० हजार इतक्या प्रचंड मतांनी मागे आहेत. त्यातही वडनेरभैरव गटातूनही डॉ. भारती पवार मागे असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्यातूनही डॉ. भारती पवार या ५० हजारांहून अधिक मतांनी मागे आहेत. त्यात महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर यांच्या न्यायडोंगरी गटातूनही डॉ. भारती पवार मोठ्या मताधिक्याने मागे आहेत. जिल्हा परिषद सदस्यांनी आता राज्यात सुरू झालेल्या नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनाम्याच्या मागणीची तळी उचलून धरली असून, जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनीही पराभव स्वीकारून नैतिकता म्हणून राजीनामे द्यावेत, अशी मागणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)