शेती महामंडळाची जमीन देण्याबाबत मंत्रालयात चर्चा
By Admin | Updated: October 28, 2015 22:43 IST2015-10-28T22:41:53+5:302015-10-28T22:43:54+5:30
शेती महामंडळाची जमीन देण्याबाबत मंत्रालयात चर्चा

शेती महामंडळाची जमीन देण्याबाबत मंत्रालयात चर्चा
मालेगाव : औद्योगिक विकासाचे प्रयोजनमालेगाव : तालुक्याच्या औद्योगिक विकासाकरिता तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन देण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी मंत्रालयात दिले. यासंदर्भात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार मंत्रालयात महसूल व कृषिमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.
राज्यमंत्री भुसे यांनी यासंदर्भात मागणी करताना सांगितले की, मालेगाव तालुक्यातील शेती महामंडळाच्या एकूण सात हजार १४१ एकर जमिनीपैकी खंडकरी शेतकऱ्यांना एक हजार ११५ एकर क्षेत्र जमीन वाटप केल्यानंतर शिल्लक असलेल्या चार हजार २४६ एकर क्षेत्रापैकी औद्योगिक विकासाच्या प्रयोजनासाठी दाभाडी, काष्टी व
अजंग शिवारातील एक हजार एकर जमीन देण्यात यावी. स्थानिकांना रोजगार मिळेल आणि तालुक्याचा औद्योगिक विकास होण्यास मदतच मिळेल.
खडसे म्हणाले, ज्या भागात उद्योग नाहीत परंतु जमिनी आहेत अशा भागात लहान औद्योगिक विकास वसाहती उभारल्या पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे. मालेगाव तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी शेती महामंडळाची जमीन देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. त्यासाठी महसूल, कृषी, उद्योग आदि विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटी देऊन सर्वेक्षण
करावे आणि महिनाभरात त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देशही महसूल व कृषिमंत्री खडसे यांनी
दिले.
बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यू. के. अग्रवाल आदिंसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)