शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर धरणातून १ हजार ६१४ क्युसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 21:57 IST

गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला.

ठळक मुद्देनाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडलारात्री साडेनऊच्या सुमारास धरणातून विसर्ग सुरू

नाशिक : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१२) मान्सून सरींनी जोरदार सलामी दिली. शहरात अवघ्या दीड ते दोन तासांत ५०.८ मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे गोदावरीचा जलस्तर उंचावला. नांदूरमधमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धरणातून १ हजार ६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला.हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविला गेला होता; मात्र दोन दिवस अगोदरच मान्सूनने शहरात हजेरी लावल्याने आता बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राच्या बाहेर जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड ते दोन तास पावसाने शहर व ग्रामिण भागातील गावांना झोडपून काढले. यामुळे गिरणारे, मखमलाबाद, मुंगसरा, मातोरी या गावांसह नाशिक शहरातून गोदावरीत पूरपाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले. यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत निफाड तालुक्याती नांदूरमधमेश्वर धरणात पाण्याची चांगली आवक झाली. पाण्याची पातळी अधिक वाढू नये, म्हणून जलसंपदा विभागाकडून १ हजार ६१४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग औरंगाबादच्या दिशेने गोदावरीत करण्यात आला. गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला. यामुळे या सर्व भागातील पावसाचे पाणी गोदावरीतून मोठ्या प्रमाणात नांदूरमधमेश्वरमध्ये रात्रीपर्यंत पोहचले. यामुळे रात्री साडेनऊच्या सुमारास धरणातून विसर्ग सुरू केला गेला. हे पाणी पहाटेपर्यंत औरंगाबादमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहाटे जर नाशिक शहरासह ग्रामिण भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली तर शनिवारी (दि.१३) नांदूरमधमेश्वर धरणातून सकाळी विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरRainपाऊस