दारणा धरणातून १० हजार क्युसेसने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:35+5:302021-09-13T04:13:35+5:30

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, शनिवारी (दि. ११) दिवसभरात इगतपुरीत ...

Discharge from Darna Dam by 10,000 cusecs | दारणा धरणातून १० हजार क्युसेसने विसर्ग

दारणा धरणातून १० हजार क्युसेसने विसर्ग

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून, शनिवारी (दि. ११) दिवसभरात इगतपुरीत ९८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर घोटीत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, धरण आतापर्यंत ९७.१० टक्के भरले असून, धरणातून १० हजार ६० क्युसेसने विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल व येत्या काही दिवसात दारणा धरणदेखील १०० टक्के भरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

निसर्ग वादळाच्या अतिवृष्टीनंतरच्या दोन महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा शनिवारपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून नदी-नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाऊस असाच सुरु राहिला तर दारणा धरणाबरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ होणार आहे. यामुळे धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रविवारी सुरू असलेल्या संततधारेने भाम, मुकणे, वाकी खापरी, आदीं धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, भावली व भाम धरण हे आधीच ओव्हरफ्लो झाले आहे.

इन्फो

८५ टक्के पाऊस

इगतपुरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गणपती बाप्पांच्या आगमनापासून आपल्या पारंपरिक शैलीत पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी (दि. १०)पासून सुरु असलेल्या संततधारेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम भागात जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासांत पुन्हा ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर आजपर्यंत २,५९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे. सरासरीच्या एकूण ८५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या दोन दिवसांच्या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्येही भरीव वाढ झाली आहे. यंदा धरणांच्या साठ्यात वाढ होत आहे तर दारणा धरणाचा आठ दिवसांपूर्वी बंद असलेला विसर्ग रविवारी सुरू करण्यात आला असून, १० हजार ६० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सुरेश जाचक यांनी दिली.

--------------------

तालुक्यातील धरणांतील जलसाठा.

*. धरण द.ल.घ.फू. टक्के

१) दारणा धरण - ६९४२ ९७.१०

२) मुकणे -. ४६०६ ६३.६३

३) भावली - १४३४ १००

४) भाम - २४६४ १००

५) वाकी खापरी - १६२९ ६५.३२

कोट....

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरण भरले असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेला पाऊस असाच पडत राहिला तर अतिरिक्त फुगवट्याच्या पाण्यामुळे सरासरीच्या तुलनेत धरण भरायला वेळ लागणार नाही. यामुळे दारणा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.

- सुरेश जाचक, शाखा अभियंता, दारणा धरण

-------------------

फोटो- १२ इगतपुरी डॅम

इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून दारणा धरणातून १० हजार ६० क्युसेसने सुरू असलेला विसर्ग.

120921\12nsk_1_12092021_13.jpg

फोटो- १२ इगतपुरी डॅम इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून दारणा धरणातून १० हजार ६० क्युसेसने सुरू असलेला विसर्ग. 

Web Title: Discharge from Darna Dam by 10,000 cusecs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.