नाशिक जिल्ह्यात ६  हजार ३९  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज ; सद्यस्थितीत २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:12 PM2020-07-19T16:12:50+5:302020-07-19T16:16:08+5:30

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असला जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी (दि.१९) सकाळी प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

Discharge of 6 thousand 39 corona patients in Nashik district; At present 2 thousand 653 patients are treated | नाशिक जिल्ह्यात ६  हजार ३९  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज ; सद्यस्थितीत २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार

नाशिक जिल्ह्यात ६  हजार ३९  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज ; सद्यस्थितीत २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार

Next
ठळक मुद्दे ९ हजार ७५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६ हजार ३९ रुग्णांना डिस्चार्जजिल्ह्यात २ हजार ६५३  पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू 

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी (दि.१९) सकाळी प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ३८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे 
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणविभागात नाशिक २०७, चांदवड ०७, सिन्नर ८७, दिंडोरी ५०, निफाड १२७, देवळा ०२,  नांदगांव ६७, येवला २७, त्र्यंबकेश्वर २६, सुरगाणा ०७, पेठ ०३, कळवण १०,  बागलाण ३२, इगतपुरी १०७, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ८००  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६८७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२२  तर जिल्ह्याबाहेरील ४४  असे एकूण २ हजार ६५३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९  हजार ७५ रुग्ण आढळून आले आहेत. तर रविवारपर्यंत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८३ , नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २०२ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८२  व जिल्ह्याबाहेरील १६  अशा एकूण ३८३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.  

Web Title: Discharge of 6 thousand 39 corona patients in Nashik district; At present 2 thousand 653 patients are treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.