मालेगाव : येथील जेएटी महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटन संस्थेच्या समन्वयक प्रा. मनोरमा कामले यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हारुण अन्सारी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक डॉ. सलमा सत्तार यांनी केले. दोनदिवसीय कार्यशाळेत प्रात्यक्षिकांद्वारे व व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सुनेत्रा मेश्रामकर यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. चंद्रशेखर निकम, विनोद पवार, संजय पवार आदिंनी मार्गर्शन केले. यावेळी सुधाकर आहिरे, मोहन बैरागी, मोहन तिसगे, राहूल शिरोळे, रोशन भालेराव आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. आएशा अन्सारी यांनी मानले. (प्रतिनिधी)
आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
By admin | Updated: January 22, 2016 22:54 IST