गाळ उपसाबाबत दोन अधिकाऱ्यांत विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:55+5:302021-06-05T04:11:55+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांत सोपान कासार यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे उभ्या असलेल्या वाहनांना अडवून गाळ काढण्याची परवानगीची कागदपत्रे मागितली. ...

Disagreement between two officials over sludge removal | गाळ उपसाबाबत दोन अधिकाऱ्यांत विसंवाद

गाळ उपसाबाबत दोन अधिकाऱ्यांत विसंवाद

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांत सोपान कासार यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे उभ्या असलेल्या वाहनांना अडवून गाळ काढण्याची परवानगीची कागदपत्रे मागितली. परंतु कागदपत्रे वाहनधारक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी तलाठी शिरसाठ यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधितांना गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याची माहिती दिली.

शेकडो टन गाळ उपसण्याची क्षमता असलेला मोठा लवाजमा घेऊन धरणाकडे कूच केलेल्या वाहनांकडे परवानगीची कागदपत्रे का नव्हती. परवानगी असेल तर ती दाखविण्यासाठी संध्याकाळपर्यंत का थांबावे लागले, असा प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

इन्फो

तलाठीही अनभिज्ञ

गाळ उपसण्याची परवानगी तहसीलदार देतात. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शिफारस आवश्यक असते. धरणातून गाळ काढण्याची परवानगी अनेक शेतकऱ्यांना देण्यात येत असते. गाळ केवळ शेतात वापरण्यासाठीच परवानगी दिली जाते. दरम्यान, तहसीलदारांनी परवानगी दिली असेल तर त्याची माहिती प्रांतांना का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पंचनामे करणारे तलाठी शिरसाठ यांनासुद्धा अशी परवानगीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

फोटो- ०४ भालूर नांदगाव

===Photopath===

040621\04nsk_32_04062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०४ भालूर नांदगाव 

Web Title: Disagreement between two officials over sludge removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.