ओझर बसस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय

By Admin | Updated: July 30, 2014 00:22 IST2014-07-29T23:13:25+5:302014-07-30T00:22:07+5:30

ओझर बसस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय

Disadvantages of passengers due to water logging in Ojhar bus stand | ओझर बसस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय

ओझर बसस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय

ओझरटाऊनशिप : संततधार पावसामुळे ओझर बसस्थानकात गेल्या दोन दिवसांपासून पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सायखेडा, पिंपळगाव, ओझर तसेच निफाड तालुक्यातील नागरिकांची या बसस्थानकात दिवसभर वर्दळ असते. असंख्य प्रवासी या बसस्थानकात ऊन पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी आसरा घेत असतात. स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने येथील निवाराशेड मध्ये जाणसाठी रस्ता राहिला नाही. स्थानकात बस उभी केल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी चिखलातून जावे लागते. या भागातील साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Disadvantages of passengers due to water logging in Ojhar bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.