ओझरटाऊनशिपवासीय शहर बससेवेपासून वंचित पहिल्या स्टॉपवर बस थांबत नसल्याने गैरसोय
By Admin | Updated: May 14, 2014 00:02 IST2014-05-13T18:13:11+5:302014-05-14T00:02:28+5:30
ओझरटाऊनशिप- येथील पहिल्या बसस्टॉपवर शहर वाहतूक बससेवेची बस गेल्या सहा महिन्यांपासून येत-जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

ओझरटाऊनशिपवासीय शहर बससेवेपासून वंचित पहिल्या स्टॉपवर बस थांबत नसल्याने गैरसोय
ओझरटाऊनशिप- येथील पहिल्या बसस्टॉपवर शहर वाहतूक बससेवेची बस गेल्या सहा महिन्यांपासून येत-जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
वसाहतीमध्ये राहणारे रहिवासी वैयक्तिक काम, शिक्षण व नौकरीसाठी नाशिक येथे जाताना व येताना शहर वाहतूक बससेवेच्या बसमधून प्रवास करतात त्यासाठी वसाहतीमध्ये अधिकृत सहा बस स्टॉप असून, तेथे शेडही उभारलेले आहे. ओझरटाऊनशिप ती नाशिक ४६ व नाशिकरोडसाठी ७ अशा ५३ फेर्या रोज २४ तासांत बसच्या होतात. ओझरटाऊनशिप ते नाशिक दरम्यान २४ थांबे असल्याने या बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या बसच्या माध्यमातून म.रा.प.महामंडळाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. असे असूनही शहर वाहतूक बस सेवेची नाशिकहून ओझरटाऊनशिपला येणारी किंवा नाशिकला जाणारी शहर मार्गावरील मोठ्या गेटने टाऊनशिपमध्ये येते. तेथून दुसर्या बसस्टॉपजवळील भाजी मार्केट येथे वळण घेऊन बस स्टॉप क्रमांक ३ ते ६ असे प्रवासी सोडत जाते. त्याच मार्गाने परत नाशिकला जाते. बस पहिल्या स्टॉपवर गेल्या सहा महिन्यांपासून येते किंवा जात नसल्याने पहिला बस स्टॉप परिसर मरिमाता गेट, श्रमिकनगर या भागातील अनेक रहिवाशी कामानिमित्त शिक्षण व नौकरीनिमित्त जातात त्यांना शहर वाहतूक बससेवेची बस पकडण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करीत भाजीमार्केट किंवा मेनगेट येथे जावे लागते. तसेच परत येताना या भागातील प्रवाशांना भाजीमार्केट येथील वळणावर बसमधून उतरून पुन्हा पायपीट करीत घराकडे यावे लागते. यामुळे प्रवासी, महिला, वृद्ध प्रवाशांचे हाल होत असून, परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी लक्ष घालून पहिल्या बसस्टॉपवर बस आणणे व नेण्यासाठी चालक व वाहकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)
---