भाविकांची गैरसोय : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पडणार ताण
By Admin | Updated: April 28, 2015 22:25 IST2015-04-28T22:24:39+5:302015-04-28T22:25:47+5:30
सिंहस्थासाठी ओढा रेल्वेस्थानक दुर्र्लक्षित

भाविकांची गैरसोय : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पडणार ताण
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर भाविकांचा संभाव्य ताण कमी करण्यासाठी ओढा रेल्वेस्थानकाचा पर्याय दिला होता; मात्र याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा झाली नसल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर भाविकांचा प्रचंड ताण पडून गैरसोय होण्याची शक्यता आहे.
आगामी सिंहस्थात जगभरातून भाविक नाशिकनगरीत येणार आहेत; मात्र भाविकांच्या तुलनेत नाशिकरोड रेल्वेस्थानकाची क्षमता कमी पडत असल्याने यावर पर्याय काढला जावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. त्याकरिता नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा रेल्वेस्थानकाचा सिंहस्थात वापर व्हावा यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
दरम्यान, त्यावर चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. सिंहस्थात नियमित गाड्यांव्यतिरिक्त सात सिंहस्थ स्पेशल अतिरिक्त गांड्या सोडल्या जाणार असल्याने या गाड्या नाशिकरोडला थांबविल्यास स्थानकावर ताण पडू शकतो. त्यामुळे या स्पेशल अतिरिक्त गाड्या ओढा स्थानकावर थांबविण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला होता; मात्र या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा केली नसल्याने भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा केला जात असलेला कायापालट बघता ओढा रेल्वेस्थानकाचा सिंहस्थात विचार केला जाऊ शकणार नसल्याचे चिन्हे आहेत. सध्या नाशिकरोड रेल्वेस्थानकाची रुंदी वाढविण्यात आली असून, ट्रॅकची लांबीदेखील वाढविली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या रेल्वेचे यूटर्नदेखील काढण्यात आले. ओव्हरहेड वायरी बदलण्यात आल्या. त्या तुलनेत ओढा रेल्वेस्थानकाच्या विकासाची कुठल्याही कामांना सुरुवात केलेली नाही. ं