पेठ येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:00 IST2020-01-09T23:59:59+5:302020-01-10T00:00:23+5:30

विविध प्रकारचे अपंगत्व नशिबी असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धेत सहभाग नोंदवत आपली चुणूक दाखवली.

Disability Students' Competition at Peth | पेठ येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा

पेठ येथे दिव्यांग खेळाडूंना पारितोषिक वितरण करताना सभापती विलास अलबाड, पुष्पा पवार, तुळशीराम वाघमारे, हेमलता गावित, सचिन गाडगीळ, नम्रता जगताप, सरोज जगताप आदी.

पेठ : विविध प्रकारचे अपंगत्व नशिबी असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धेत सहभाग नोंदवत आपली चुणूक दाखवली.
पेठ येथे तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये नियमित मुलांबरोबर दिव्यांग बालकांसाठी स्वतंत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० मी. धावणे, संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे आदींचा समावेश करण्यात आला. विजयी स्पर्धकांना धनलक्ष्मीचे संचालक सचिन गाडगीळ यांच्या मदतीतून पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी जि.प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती विलास अलबाड, उपसभापती पुष्पा पवार, तुळशीराम वाघमारे, श्याम गावित, मनोज घोंगे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, अपंग समावेशीत शिक्षण गटसाधन केंद्राचे नितीन पठाडे, सुनंदा सोनार, हेमंत भोये, दिनेश भरणे, लीना महाले, पूनम साळुंके यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Disability Students' Competition at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.