दिव्यांग विद्यार्थ्याच्या नृत्याने जिंकली प्रेक्षकांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:26 PM2020-01-14T21:26:24+5:302020-01-15T00:12:37+5:30

दिंडोरी : तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक दिव्यांग स्पर्धेच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रकारांमध्ये अवनखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी ओमकार कोकाटे या विद्यार्थ्याने आपल्या अपंगत्वावर मात करत केलेल्या वैयक्तिक नृत्याने उपस्थित मान्यवरांसह सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली.

Disability student dance won the hearts of the audience | दिव्यांग विद्यार्थ्याच्या नृत्याने जिंकली प्रेक्षकांची मने

ओमकार कोकाटे या विद्यार्थ्याला उचलून घेऊन कौतुक करताना तुकाराम जोंधळे, बी. डी. कनोज, एस. एस. घोलप, के. पी. सोनार, सुनीता अहिरे आदींसह मान्यवर अतिथी.

Next

दिंडोरी : तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक दिव्यांग स्पर्धेच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रकारांमध्ये अवनखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थी ओमकार कोकाटे या विद्यार्थ्याने आपल्या अपंगत्वावर मात करत केलेल्या वैयक्तिक नृत्याने उपस्थित मान्यवरांसह सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे अडीच हजार रु पयांपेक्षा जास्त रक्कम जमा करून प्रमुख अतिथींच्या हस्ते ओमकारला देण्यात आली. तसेच याप्रसंगी उपस्थित जऊळके (दिं.) गावचे तुकाराम जोंधळे यांनी ओमकारच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले. ओमकारला सुरेखा कापडणीस, संध्या परदेशी, अलका गायकवाड, संजय खरे, कौशल्या गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, उपसभापती विनता अपसुदे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, छाया गोतरणे, पंचायत समिती सदस्य वसंत थेटे, संगीता घिसाडे, बेबी सोळसे, मालती खराटे, वलखेडचे सरपंच सुशीला पाटील, संपत शिंदे, वामन पाटील, स्पर्धा आयोजक गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, शालेय पोषण आहार अधीक्षक रूपाली पगार, विस्ताराधिकारी एस. के. पी. सोनार, सुनीता आहेर, एस. एस. कोष्टी आदी प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित होते.

Web Title: Disability student dance won the hearts of the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.