भगूर येथे अपंग दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:31+5:302020-12-07T04:09:31+5:30

भगूर : येथील अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करून भगूरमधील प्रत्येक अपंगांना प्रमाणपत्र ...

Disability Day program at Bhagur | भगूर येथे अपंग दिनानिमित्त कार्यक्रम

भगूर येथे अपंग दिनानिमित्त कार्यक्रम

भगूर : येथील अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करून भगूरमधील प्रत्येक अपंगांना प्रमाणपत्र पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिवाजी चौकातील मारुती मंदिरात जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगूर अपंग क्राती संघटनेचे शहर प्रमुख चंद्रकांत दामोदर वालझाडे, जिल्हा संपर्कप्रमुख जेकब पिल्ले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रभान गांगुर्डे, राज्य समन्वयक संध्या जाधव यांनी उपस्थित अपंग बांधवांना शासकीय योजना तसेच स्वयंरोजगाराबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी काही दिव्यांग बंधूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रकाचे वाटप करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वालझाडे यांच्या हस्ते मान्यवराना शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी योगेश भालेराव, बाळू बडदे, झुंबर करंजकर, श्याम मोहिते, संदीप जाधव, साजिद शेख, अशोक सोनवणे, शेखर भोसले, नदीम शेख, विनोद बच्छाव, नंदकुमार ससाणे, अशोक करंजकर, सुदाम इंदारखे, कल्पेश करंजकर, मंजूताई भालेराव उपस्थित होते.

(फोटो ०६ भगूर )

Web Title: Disability Day program at Bhagur