जिल्हा बॅँकेसाठी संचालकांचे अर्ज
By Admin | Updated: April 22, 2015 01:24 IST2015-04-22T01:23:37+5:302015-04-22T01:24:02+5:30
जिल्हा बॅँकेसाठी संचालकांचे अर्ज

जिल्हा बॅँकेसाठी संचालकांचे अर्ज
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी बॅँकेच्या माजी संचालकांनी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, माणिक कोकाटे, संदीप गुळवे, अद्वय हिरे, राजेंद्र डोखळे, चंद्रकांत गोगड, नरेंद्र दराडे, शिवाजी चुंभळे, अविनाश अरिंगळे यांचा समावेश आहे. सोमवारी नाना सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता.