देशातील १७ पदवीधरांत नाशिकचे दिग्दर्शक

By Admin | Updated: August 21, 2015 00:22 IST2015-08-21T00:16:02+5:302015-08-21T00:22:11+5:30

‘स्मार्ट’ अभ्यासक्रम : काळोखे यांना पदवी प्रदान

Director of Nashik, 17 graduates from the country | देशातील १७ पदवीधरांत नाशिकचे दिग्दर्शक

देशातील १७ पदवीधरांत नाशिकचे दिग्दर्शक

नाशिक : भारतीय रंगभूमीसाठी झटणाऱ्या रंगकर्मींच्या कार्यकक्षा उंचावण्याच्या उद्देशाने त्यांना संबंधित व्यवस्थापनाचे धडे मिळावेत, यासाठी कार्यरत ‘स्मार्ट’ (स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन द फिल्ड आॅफ थिएटर आर्ट) या इंडिया थिएटर फोरमच्या विशेष उपक्रमातून देशभरातील पहिल्या सतरा स्नातकांना पदवीने गौरवण्यात आले. त्यांत येथील नाट्यदिग्दर्शक प्रवीण काळोखे यांचा समावेश आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून शहराच्या प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या काळोखे यांनी भारतीय कला क्षेत्रातील हा पहिला एकमेव अभ्यासक्रम बंगळुरू येथे पूर्ण केला. ‘स्मार्ट’चा पदवीदान सोहळा मुंबईतील मॅक्सम्युलर भवन येथील गोएथे इन्स्टिट्यूट येथे नुकताच झाला. अनुभवी, तज्ज्ञ रंगकर्मींनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमासाठी देशभरातून १७ रंगकर्मींची लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन निवड करण्यात आली होती. त्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने काळोखे यांना पाठवण्यात आले होते. या अभ्यासक्रमात कलेचे व्यवस्थापन व दुर्लक्षित कलाप्रांताबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. नाट्यसंस्थेचे ध्येय, धोरण, लक्ष्य तसेच शहराची, समाजाची नेमकी परिस्थिती व गरज यांचा विचार करून आठ महिन्यांच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली होती. त्यात युनेस्को कल्चरल पॉलिसीचे अध्यक्ष प्रा. मिलेना, ‘जुनून’चे समीर अय्यंगार, ‘आयएफए’ बंगळुरूच्या अरुंधती घोष, ‘पृथ्वी’च्या संजना कपूर, सुधनवा देशपांडे, सुनील शानबाग यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकच्या रंगकर्मींसाठी या अभ्यासक्रमाबाबत लवकरच दृकश्राव्य माध्यमातून कार्यशाळा घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Director of Nashik, 17 graduates from the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.