नाशिक : अपमानास्पद वागणुक दिल्याचा राग मनात धरत चार संशयितांच्या टोलक्याने भाभानगर परिसरातील एका रूग्णालयाच्या थेट संचालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी एका संशयीताला अटक केली आहे. फैजल शेख असे संशयीताचे नाव आहे.याप्रकरणी प्रमोद आहेर (रा.अमरधाम) यांनी पोलिसांकडे तक्र ार दाखल केली आहे. भाभानगर येथील एका खासगी हॉस्पिटलचे ते संचालक आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या आठवडाभरापासून नसरूद्दीन शेख नावाच्या एका रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हायपर टेन्शन आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या रूग्णाची मुलगी आणि संशयीत फैजल हे आहेर यांच्या कॅबिनमध्ये चर्चेसाठी गेले होते. यावेळी फैजलने आहेर यांच्याशी उर्मट भाषा वापरल्याने त्यास कॅबिन बाहेर काढण्यात आले होते. कक्षातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मंगळवारी (दि.१४) रात्री आहेर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आहेर आपल्या वाहनातून सुरक्षारक्षक दर्शनसोबत रूग्णालयाबाहेर पडत असताना टोळक्याने त्यांच्या मोटारीवर काहीतरी टनक वस्तू फेकून मारली. त्यामुळे आहेर यांनी आपले वाहन थांबविले असता त्यांना शिवीगाळ करीत वाहनाबाहेर ओढून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
रूग्णालयाच्या संचालकाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 18:23 IST
कक्षातून बाहेर काढल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मंगळवारी (दि.१४) रात्री आहेर यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रूग्णालयाच्या संचालकाला बेदम मारहाण
ठळक मुद्देकॅबिनबाहेर काढल्याचा राग रूग्णाच्या नातेवाईकांवर गुन्हा