नाशिकरोडसाठी दारणा धरणातून थेट जलवाहिनी याेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:38+5:302021-09-04T04:19:38+5:30

याच बैठकीत एसआरए म्हणजेच झोपडपट्टी पुर्नवसनासाठी प्राधीकरण तयार करण्याबरोबरच पूररेषेची तीव्रता कमी करणे, फाळके स्मारकाचे नुतनीकरण आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या ...

Direct water supply scheme from Darna Dam for Nashik Road | नाशिकरोडसाठी दारणा धरणातून थेट जलवाहिनी याेजना

नाशिकरोडसाठी दारणा धरणातून थेट जलवाहिनी याेजना

याच बैठकीत एसआरए म्हणजेच झोपडपट्टी पुर्नवसनासाठी प्राधीकरण तयार करण्याबरोबरच पूररेषेची तीव्रता कमी करणे, फाळके स्मारकाचे नुतनीकरण आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत वेतन तसेच नेाकरभरतीचा प्रश्नही मार्गी लावण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईत शुक्रवारी (दि.३) एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीस विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेनेेचे महानगर प्रमुख आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे यावेळी उपस्थित होते.

नाशिकरोड येथे दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जात असला तरी चेहडी बंधाऱ्याच्या जवळ मलयुक्त पाणी येत असल्याने दारणा धरणातून नाशिकरोडपर्यंत थेट जलवाहिनी योजना साकारण्यात येणार आहे. याशिवाय नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या जलवाहिनी अत्यंत जुन्या आणि जीर्ण झाल्या असून त्याच्या नूतनीकरणाचा देखील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नगरविकास मंत्र्यांनी दिले. नाशिकरोड येथील जलवाहिनी योजना आणि मनपा- जलसंपदा विभागाचा रखडलेला करार याबाबत लवकरच जलसंपदा मंत्र्यांसमवेत महापालिकेची बैठक घेण्यात येईल असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

फाळके स्मारकातही राज्य शासन घालणार लक्ष

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या नुतनीकरणासाठी आता भाजप सेनेत चढाओढ लागली आहे. आता राज्यशासन त्यात लक्ष घालणार आहे.

इन्फो...

समाजमंदिर, अभ्यासिकांना मिळणार दिलासा

महापालिकेच्या मिळकती समाजमंदिर, व्यायामशाळा आणि वाचनालयासाठी भाड्याने देण्यात आल्यानंतर त्याला आता रेडिरेकनरच्या आठ टक्के भाडे आकारण्याचा निर्णय यापूर्वीच्या राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, आता अशा मिळकतींना अडीच टक्के इतकेच भाडे आकारणी करण्याची शिवसेनेने केलेली मागणी नगरविकास मंत्र्यांनी तत्त्वत: मान्य केली आणि प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

इन्फो...

गावठाण क्लस्टरच्या क्षेत्राच्या अटीत बदल

राज्य शासनाने नाशिकमध्ये गावठाण विकास म्हणजेच क्लस्टरसाठी चार हजार चौरस फूट क्षेत्रातील वाडे एकत्र करून पुनर्विकासाची याेजना मांडली आहे. मात्र, त्यात बदल करून १ हजार चौरस मीटर क्षेत्र अशी अट करण्याची मागणी नगरविकास मंत्र्यांकडे करण्यात आली. क्लस्टर आणि पूररेेषेतील त्रुटीचा अहवाल पाठवण्याचे आदेश यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

इन्फो...

या महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

- झोपडपट्टी पुर्नविकास योजनेसाठी प्राधीकरण स्थापन करणार

- अमृत योजनेच्या २२६ कोटी रुपयांच्या आराखड्याला लवकरच मंजुरी

- लष्करी हद्दीलगतच्या बांधकामांना शिथीलता

- बहुमजली वाहनतळासाठी निधी

- बाह्यवळण मार्गांसाठी शासनाकडून निधी

- बांधकाम परवानग्या ऑफलाईन देणार

Web Title: Direct water supply scheme from Darna Dam for Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.