शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

देवळाली कॅम्पसाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:50 IST

देवळाली शहराच्या आगामी लोकसंख्येचा विचार करून पाणीगळती रोखण्यासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासह सन दोन वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देकॅन्टोन्मेंट बोर्डाचा निर्णय : दोन वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

देवळाली कॅम्प : देवळाली शहराच्या आगामी लोकसंख्येचा विचार करून पाणीगळती रोखण्यासाठी दारणा धरणातून थेट पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासह सन दोन वर्षांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.कॅन्टोन्मेंट बोर्डाची विशेष सभा ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या चर्चेत २०१९-२०च्या अर्थसंकल्पास मंजुरी देताना ११७ कोटी ४८ लाख २३ हजार ९४२, तर २०२०-२१साठी १२१ कोटी ३७ लाख ८५ हजार ८२० रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ३६ वर्षे जुन्या झालेल्या पाणीपुरवठा योजनेत बदल करण्यासाठी ३३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला, तर वॉर्ड क्र. ८ मधील विजयनगर भागासाठी साडेनऊ लाख लिटर क्षमतेच्या ४ कोटी ४८ लाख रुपयांच्या स्वतंत्र जलकुंभास मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरातील मोकाट कुत्र्यांना पायबंद घालण्यासाठी दोन लाख रुपये खर्चाचा वार्षिक ठेका देण्याला मान्यता देण्यात आली. बोर्डाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश यासाठी ४० लाख रुपयांची मान्यता देण्यात आली. तसेच आनंदरोड मैदानावर होऊ घातलेल्या क्रीडा संकुलासाठी वीज मंडळाचे पोल हटविण्याकामी सहा लाख रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. अनेक रस्त्यावर असलेल्या विद्युत पोल इतरत्र हलवण्याबाबत मात्र काहीच चर्चा झाली नाही.संरक्षण मंत्रालय व डायरेक्टर जनरल कार्यालय, नवी दिल्ली यांच्याकडून पाणी बचतीसाठी आलेल्या आदेशानुसार सर्व प्रशासकीय कार्यालयांत असलेले नळ बदलण्यासाठी दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. बजेट व विशेष कामाचे प्रस्ताव सर्दन कमांड पुणे येथे पाठविण्यात आले असून, चालू महिन्यात बोर्ड अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर सदर प्रस्ताव डायरेक्टर जनरल व संरक्षण मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातील.रस्त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्षभुयारी गटारीच्या कामामुळे संपूर्ण देवळालीचे रस्ते चिखलमय झालेले आहेत. भुयारी गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने खोदलेले रस्ते पूर्ववत करणे क्रमप्राप्त असताना एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत सभागृहात चर्चाही केली नाही.

टॅग्स :Nashikनाशिकwater transportजलवाहतूक